🔥 TRENDING BJP MLA Ramakanta Deuri vows to cut Or... CM urges direct farmer dialogue, order... અગોલ પ્રાથમિક શાળાના બાળ વૈજ્ઞાનિકે વે... उमरिया जिला जेल में ई-केवाईसी एवं विधि... અરબ સાગરમાં ₹3000 કરોડના ડ્રગ્સ સાથે 5... भितरवार विधायक मोहन सिंह राठौर ने श्या...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगाव जिल्ह्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा.....!!

जळगाव जिल्ह्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा.....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 30 Sep 2026, 06:38 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

एरंडोल (जळगाव) - कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील एका गावात घडली आहे.

१८ वर्षीय पीडिता (नाव बदलले आहे) रोज एसटी बसने महाविद्यालयात जात होती. महाविद्यालय परिसरात आणि बस प्रवासात काही तरुणांकडून सातत्याने छेडछाड, शेरेबाजी केली जात असल्याची तक्रार तिने कुटुंबीयांकडे केली होती. या त्रासामुळे तिने कॉलेजला जाणे टाळण्यास सुरुवात केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी पीडिता घरी एकटी असताना ही घटना घडली. कुटुंबीय मजुरीसाठी बाहेर गेले होते. सायंकाळी आई घरी परतली असता मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. तातडीने एरंडोल शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यात एक अनोळखी क्रमांक आढळला. तसेच घटनेच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास काही संशयित तरुण पीडितेच्या घराच्या परिसरात फिरताना दिसल्याचे एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले असून, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचा दावा आहे.

या प्रकरणी मयतेच्या भावाच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात भाग ५ गु.र.न. १४७/२०२६ अन्वये अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासोदा येथील महेश विठ्ठल मराठे, अभिषेक सुनील उशीरे, रोहित महेंद्र मोरे, मनोज रामभाऊ गढरी आणि रुपेश आनंदा वारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कुटुंबीयांनी या तरुणांकडून त्रास होत असल्याचा आरोप केला असून, या आरोपांचा आणि मृत्यूचा नेमका संबंध काय आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. पुढील तपास चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील करत आहेत.
📲Get App