🔥 ट्रेंडिंग સુરતમાં સ્વિમિંગ પૂલમાં ગર્બા નૃત્ય, સ... મહિલા ચૌક પાસે divider ઉપર ચઢી ગયેલી ક... સરકારી વિનયન કૉલેજ, અમીરગઢ ખાતે એન.એસ.... વિક્ટોરિયા હેવન ફ્લેટ, હંસપુરા: વત્સલન... હિંમતનગર એ.ડીવીઝન પોલીસ દ્વારા પકડાયેલ... बीजेपी ने राहुल गांधी की सुप्रीम कोर्ट...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जळगाव हादरले...! प्रॉपर्टीच्या वादातून २८ वर्षीय तरुणावर गोळीबार; विवेकानंद नगरात खळबळ..!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 अक्टू. 2026, 03:50 PM 👁 20
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जळगाव हादरले...! प्रॉपर्टीच्या वादातून २८ वर्षीय तरुणावर गोळीबार; विवेकानंद नगरात खळबळ..!!!

विभागीय प्रतिनिधी

जळगाव - शहरातील विवेकानंद नगर भागात जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून २८ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अर्जुन रोहिदास राठोड (वय २८) याचा प्रॉपर्टीच्या कारणावरून काही जणांसोबत वाद सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयात दावाही प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवेकानंद नगरमधील रिदम हॉस्पिटलजवळ अर्जुन राठोड आणि हल्लेखोरांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वाद विकोपाला गेल्यानंतर हल्लेखोरांनी अर्जुनवर जवळून गोळी झाडली. या हल्ल्यात गोळी अर्जुनच्या उजव्या कानाखाली लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गडातुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.

या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
📲Get App