🔥 ट्रेंडिंग कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... भारत-केनाडा ने व्यापार समझौते पर पाँचव... संजय गुप्ता ने उठाए सवाल: रणबीर, रणवीर... नॉरईस्टर ने यूएस पूर्वी तट पर बाढ़ मचा... अक्टूबर 2026: दुर्लभ ग्रह संयोजन से धन...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; बस स्थानकावरील सोनसाखळी चोरटा गजाआड, ४.५९ लाखांचे दागिने जप्त...!!

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; बस स्थानकावरील सोनसाखळी चोरटा गजाआड, ४.५९ लाखांचे दागिने जप्त...!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 15 सित. 2026, 05:45 AM 👁 57
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चोरी

विभागीय प्रतिनिधी

जळगाव - जिल्ह्यातील बस स्थानकांवर गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. सागर दादासाहेब जाधव (वय ३१, रा. खर्डे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे.

१२ सप्टेंबर रोजी एलसीबीचे पथक जळगावच्या मुख्य बस स्थानकावर गस्त घालत होते. यावेळी संशयास्पदरित्या फिरणारा जाधव पथकाच्या निदर्शनास आला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांसमोर त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात चोरीचे सोन्याचे दागिने सापडले.

चौकशी दरम्यान आरोपीने तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. मुक्ताईनगर बस स्थानकावर एका महिलेचे मंगळसूत्र, एरंडोल बस स्थानकावर एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि जामनेर बस स्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत त्याने लांबवल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. त्यावेळी मुक्ताईनगर, एरंडोल आणि जामनेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

आरोपीकडून पोलिसांनी एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख ५९ हजार रुपये आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार आणि एलसीबीच्या पथकाने पार पाडली.
📲Get App