🔥 TRENDING कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगाव - भुसावळ महामार्गावर भीषण अपघात; रिक्षा भिंतीवर आदळली, वृद्ध महिलेसह प्रवासी गंभीर जखमी....

जळगाव - भुसावळ महामार्गावर भीषण अपघात; रिक्षा भिंतीवर आदळली, वृद्ध महिलेसह प्रवासी गंभीर जखमी....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 17 Sep 2026, 06:34 PM 👁 43
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जळगाव : जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षाचा नशिराबाद येथे नॅशनल पत्रा परिसरात भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यामधील एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. अपघातानंतर जखमी प्रवासी मदतीसाठी विव्हळत असताना नॅशनल पत्राचे मालक व उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने धाव घेत जखमींना मदत केली व उपचारासाठी हलवले.

अपघाताचे नेमके कारण काय आहे आणि जखमींची सध्याची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
📲Get App