देश
जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महत्त्वपूर्ण संदेश

जनगणना २०२७ – राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
नमस्कार,
मी वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, जनगणना हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. जनगणनेच्या माध्यमातून नागरिकांची अचूक माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे शासनाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचे योग्य नियोजन करता येते.
१ मे ते १५ मे – स्व-गणना (Self Enumeration)
या कालावधीत नागरिकांनी स्वतः census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरावी. माहिती भरल्यानंतर मिळणारा विशेष कोड जतन करून ठेवावा.
१५ मे ते १५ जून – घरोघरी जनगणना
या कालावधीत जनगणना प्रगणक आपल्या घरी भेट देतील. ते कुटुंबासंबंधी आवश्यक माहिती विचारतील. नागरिकांनी त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.
माझे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की,
आपण सर्वांनी जनगणना २०२७ या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. शक्यतो स्व-गणनेच्या कालावधीत स्वतःची माहिती ऑनलाइन भरावी. तसेच प्रगणक घरी आल्यावर त्यांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.
जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नसून देशाच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याच्या नियोजनाचा महत्त्वपूर्ण आधार आहे.
चला, जनगणना २०२७ मध्ये सहभागी होऊया आणि विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया!
आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा.
– जिल्हाधिकारी, चंद्रपूर