🔥 TRENDING वाराणसी में यूजीसी के विरोध में छात्रो... ग्राम राजपुर धाम में धूमधाम से हुआ भगव... उन्नाव में मूसलाधार बारिश से जनजीवन अस... LPU Students Protest Against Administr... User Searches for 'deescalatetensions'... TribuneIndia.com Users Search for "Jij...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
हुपरी सिटीसर्वेसाठी निधी मंजूर
Politics

हुपरी सिटीसर्वेसाठी निधी मंजूर

✍️ Reporter: Maruti Shevale 🗓 25 Aug 2026, 12:08 AM 👁 29
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

,,

नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश; हुपरी सिटीसर्वे निधी मंजूर.

प्रतिनिधी, मारुती शेवाळे

हुपरी नगर परिषद हुपरी,नगराध्यक्ष व शिष्टमंडळाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हुपरी नगरपरिषद हद्दीतील विस्तारित क्षेत्राची मोजणी व प्रॉपर्टी कार्डसाठीचा *16 लाख 10 हजार 299 रुपयांचा* निधी अखेर वितरित झाला आहे.जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यांनी *जावक क्र. जिनिस/O/2026/Aug/FRO/00485, दि. 20/08/2026* अन्वये हा आदेश जारी केला असून, जिल्हाधिकारी *डॉ. विजय राठोड* यांनी त्यास मंजुरी दिली आहे.हुपरी शहरालगत गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात नववसाहती समाविष्ट झाल्या आहेत. सिटी सर्व्हे नसल्याने नागरिकांना सुमारे *58 वर्षांपासून* प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न भेडसावत होता.या प्रश्नी लोकनियुक्त नगराध्यक्ष *मंगलराव माळगे* यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष प्रकाश रणदिवे, अमेय जाधव (पक्षप्रतोद भाजपा )गोपी शेटे( पक्षप्रतोद शिवसेना शिंदे गट) अमर माने (नगरसेवक) संदीपनी आपटे (नगरसेवक)आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख *शिवाजी भोसले* आणि जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
(लेखाशिर्ष 34511641)* मधून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर या कार्यान्वयीन यंत्रणेस हा निधी केवळ मंजूर कामावरच खर्च करावा, अन्य कामावर वळवू नये, दरमहा 5 तारखेला प्रगती अहवाल सादर करावा, काम पूर्ण झाल्यावर 8 दिवसात उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे अशा 25 अटींसह हा निधी वितरित करण्यात आला आहे.
📲Get App