🔥 TRENDING Ramdevpir Yuvak Akhyan Mandal એ Fataji... संविधान दिवस पर पुलिसकर्मियों ने ली रा... तमाड़ में धूमधाम से मनाया गया संविधान... ஸ்ரீ மணக்குள விநாயகர் மருத்துவக் கல்லூ... भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चा कानपुर-बु... हाजीपुर में महिला सब-इंस्पेक्टर को रिश...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

हिप्परगा थडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा; सामूहिक वाचनाने दिला संदेश

✍️ Reporter: G. P. G. U. .7798377959 🗓 26 Nov 2026, 10:00 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामूहिक संविधान वाचनाने एकतेचा संदेश देण्यात आला.

बिलोली: २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून हिप्परगा थडी येथील डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाला वंदन करून झाली. त्यानंतर, उपस्थितांनी सामूहिकरीत्या भारतीय संविधानाचे वाचन केले.

यावेळी मातंग समाजातील समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते जकोजी एडकेवार, मरिबा अंजनीकर, गंगाराम एडकेवार, पांडू पाचपिपोळीकर, बापूराव वाघमारे उपस्थित होते. तसेच, वाचनालय समितीचे अध्यक्ष पत्रकार एडकेवार, उपाध्यक्ष सुनील अंजनीकर, सहसचिव दीपक एडकेवार, ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, युवा कार्यकर्ते बजरंग गायकवाड, अनिल एडकेवार, अर्जुन एडकेवार, आकाश लघुळकर, विनोद अंजनीकर, उमाकांत एडकेवार, राणा एडकेवार, ओमकार रेड्डीवार आणि वाचनालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पत्रकार मारोती एडकेवार यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी भारतीय संविधान देऊन आपल्यावर मोठे उपकार केले आहेत. बाबासाहेब हेच आपले सर्वस्व असून, भारतीय संविधान हे आपले श्वास आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
📲Get App