🔥 TRENDING 58वें वार्षिक मेला महोत्सव के पोस्टर क... Specialist Shortage in Dhar District H... Congress Leaders' Detention Sparks Str... Alto Car Overturns and Ignites on Nagp... कांग्रेस के सभी बड़े नेता मौजुद रहे हांसपुर: सरपंच पद उम्मीदवार महेश कुमार...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
हंचिनाळच्या 'त्या' १०० कुटुंबांचे आयुष्य अंधारातच!

हंचिनाळच्या 'त्या' १०० कुटुंबांचे आयुष्य अंधारातच!

✍️ Reporter: Anil Jinagonda Patil 🗓 08 Oct 2026, 03:46 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हंचिनाळच्या 'त्या' १०० कुटुंबांचे आयुष्य अंधारातच!

हंचिनाळच्या 'त्या' १०० कुटुंबांचे आयुष्य अंधारातच!
२४ तास विजेसाठी गुरुवारी ब्रह्मनाथ मंदिरात बेमुदत उपोषण
हेस्काॅमच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप
कोगनोळी, ता. ४ : डिजिटल इंडिया आणि २४ तास वीज पुरवठ्याच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा भीषण आणि विदारक चेहरा हंचिनाळ (कुरणे मळा, चौगुले मळा) येथे समोर आला आहे. तब्बल ७० ते ८० वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेल्या १०० हून अधिक कुटुंबांना आजही २४ तास घरगुती विजेपासून वंचित राहावे लागत आहे. हेस्काॅमच्या या मनमानी आणि भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर गुरुवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ग्रामदैवत ब्रह्मनाथ देवाचे दर्शन घेऊन ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
कुरणे मळा व चौगुले मळा परिसरातील १०० हून अधिक घरांना स्वतंत्र घरगुती वीज वाहिनी देण्याऐवजी, शेतीच्या विजेवरच जोडणी देण्यात आली आहे. सध्या या भागात केवळ सकाळी ८ ते ११ आणि रात्री १० ते १२ याच वेळात वीज असते. ऐन परीक्षेच्या काळात आणि रात्रीच्या वेळी लाईट गायब असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची अडचण होत आहे. रात्रीच्या अंधारात लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांचे हाल पाहावत नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हेस्काॅम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उंबरठ्या झिजवूनही केवळ पोकळ आश्वासनांशिवाय ग्रामस्थांच्या पदरी काहीही पडलेले नाही.
आम्ही माणसासारखे जगायचे की नाही?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने ग्रामस्थांचा संयमाचा बांध आता फुटला आहे.
गुरुवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ देवाचे दर्शन घेऊन नागरिक उपोषणाचे अस्त्र उपसणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तायगोंडा पाटील यांनी दिली. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी बैठकीस सचिन कुरणे, बाळासो मजगे, विकास कुरणे, नागेश चौगुले, जनार्दन पाटील, अनिल पाटील, नवनाथ चौगुले, पिंटू चौगुले, तुषार कुंभार, आनंद चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
📲Get App