🔥 ट्रेंडिंग ਪਰਵਿੰਦਰ ਝੋਟਾ ਕਤਲ ਮਾਮਲੇ 'ਚ ਡਰੱਗ ਇੰਸਪੈਕਟ... दर्ज़ींगन फ़िल्म फेस्टिवल का दूसरा संस... मिज़ोरम विश्वविद्यालय ने 2026 के लिए अ... मिजोरम में ग्रामीण सड़कों के लिए केंद्... मुख्यमंत्री पेमा खंडू ने अरुणाचल के ती... लदाख के गवर्नर सिंग ने कहा, लेख 370 के...
31 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मौसम

घर सोडले; पण चंद्रपुरात थांबला प्रवास! बिहारमधील दोन अल्पवयीन मुली चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात

✍️ रिपोर्टर: Doctor:PINTU PAUL 🗓 31 अक्टू. 2026, 07:14 PM 👁 22
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

घर सोडले; पण चंद्रपुरात थांबला प्रवास! बिहारमधील दोन अल्पवयीन मुली चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात

घर सोडले; पण चंद्रपुरात थांबला प्रवास! बिहारमधील दोन अल्पवयीन मुली चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात

चंद्रपूर | प्रतिनिधी

बिहार राज्यातून कोणालाही न सांगता घर सोडून थेट बंगळुरूकडे निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा प्रवास चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबला. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात यश आले. विविध यंत्रणांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर आरपीएफकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने तातडीने रेल्वे स्थानक गाठले. प्राथमिक चौकशीदरम्यान दोन्ही मुली बिहारमधील रहिवासी असून, घरातील कोणालाही माहिती न देता त्या बंगळुरूच्या दिशेने प्रवास करत असल्याचे समोर आले.

यानंतर संबंधित पथकाने दोन्ही मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या मौखिक निर्देशानुसार त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना चंद्रपूर येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये निवारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत मुलींच्या पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

चाइल्ड हेल्पलाइन पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका

या संवेदनशील मोहिमेत चाइल्ड हेल्पलाइनच्या समुपदेशक दीपाली मसराम, अंकुश उराडे, सचिन नागपुरे, सुमित जंगरा आणि सुनीता हलबर्गे यांनी समन्वय साधून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

रेल्वे सुरक्षा दल, चाइल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समन्वयामुळे दोन अल्पवयीन मुलींना वेळेत सुरक्षितता मिळाली. या घटनेतून बालकांच्या सुरक्षेसाठी सामाजिक जागरूकता आणि प्रशासनाच्या सतर्कतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
📲Get App