🔥 TRENDING శోభనాద్రిపురం: శ్రావణ్ కుమార్ గారు దసర... रामकृपाल यादव ने जगनपुरा में कन्या पूज... Uttarakhand Man Evades Traffic Ticket,... Emirates Flight to Dubai Delayed at De... Uddhav Thackeray Criticizes Delhi Prot... NIA Charges Four in Grenade Attack Nea...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

घुंगरू’मुळे कलाकारांच्या करिअरला नवी दिशा; लोककलावंतांकडून तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा गौरव

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 18 Oct 2026, 02:14 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तृप्ती फिल्म प्रोडक्शन हाऊस’ला सांगलीच्या नूतन कला केंद्राच्या वतीने सदिच्छा भेट

घुंगरू’मुळे कलाकारांच्या करिअरला नवी दिशा; लोककलावंतांकडून तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा गौरव

​शिरूर | प्रतिनिधी
कला आणि कलाकारांप्रती असलेले प्रेम जपणाऱ्या शिरूर येथील ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन हाऊस’ला सांगलीच्या नूतन कला केंद्राच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली. लोककलावंत श्रीमती शोभाताई लाखे, सिनेअभिनेते पापाभाई जमादार बोरगावकर, महादेव लाखे, मुकुंद रासकर आणि अशोक जावळे यांनी या भेटीत सहभाग घेतला.
​या विशेष प्रसंगी निर्माते रामदासजी राऊत यांनी सर्व पाहुण्यांचा सन्मान केला. ‘घुंगरू’ लघुचित्रपटातील आठवणींना उजाळा देताना पापाभाई जमादार म्हणाले की, या चित्रपटामुळे अनेक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ आणि पुढील प्रवासासाठी चित्रपटांमध्ये कामानुसार संधी मिळाल्या. त्यांनी या यशाचे श्रेय रामदास राऊत यांच्या दूरदृष्टीला दिले.
​भेटीचा समारोप करताना, पापाभाई बोरगावकर व शोभाताई लाखे यांनी निर्वी येथील ताशा सम्राट शिरजभाई व शकील मन्यार यांच्या घरी जात स्नेहभोजनाचा आनंद घेतला. मन्यार कुटुंबीयांनी सर्व पाहुण्यांचा अत्यंत आदराने सन्मान केला. तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी उपस्थितांनी यावेळी सदिच्छा व्यक्त केल्या.
📲Get App