🔥 ट्रेंडिंग कांग्रेस के खिलाफ किन्नरों का प्रदर्शन... राजस्थान हाईकोर्ट ने 2016 एसआई भर्ती क... આજરોજ જાફરાબાદ તાલુકાના રોહિસા મુકામે... जयपुर लिटरेचर फेस्ट की दूसरी सूची में... આરેણા પ્રાથમિક શાળા અને ચાર આંગણ વાડી... तेजवीर की संघर्ष कथा: सपनों को साकार क...
30 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
खेल

गायन क्षेत्रात सौरभची दमदार वाटचाल; ‘सारेगमप’च्या विजेत्याची सुरेल कारकीर्द

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 30 अक्टू. 2026, 11:38 AM 👁 30
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सौरभने ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्याकडे तब्बल १३ वर्षे गायनाचे प्रशिक्षण

गायन क्षेत्रात सौरभची दमदार वाटचाल; ‘सारेगमप’च्या विजेत्याची सुरेल कारकीर्द

पुणे | प्रतिनिधी : 30 ऑक्टोबर 2026

अहमदनगरचा युवा गायक सौरभ याने आपल्या सुरेल आवाजाने गायन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गौरव महाराष्ट्राचा – मूर्ती लहान, कीर्ती महान’ तसेच ई-टीव्ही मराठी ‘सारेगमप’ या लोकप्रिय कार्यक्रमातील विजेता म्हणून सौरभने आपल्या गायनकौशल्याची छाप उमटवली आहे.

सौरभने ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्याकडे तब्बल १३ वर्षे गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे सौरभ हा सुरेश वाडकर यांचा शिष्य म्हणूनही ओळखला जातो. दीर्घकाळ घेतलेल्या शास्त्रीय व गायनाच्या प्रशिक्षणामुळे त्याच्या आवाजात विशेष पकड आणि सादरीकरणात आत्मविश्वास दिसून येतो.

गायन क्षेत्रातील आपल्या प्रवासासोबतच सौरभचे तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत सर यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. या स्नेहसंबंधामुळे कला आणि संगीत क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्येही त्यांचा संपर्क कायम राहिला आहे.

लहान वयातच आपल्या प्रतिभेची ओळख निर्माण करणाऱ्या सौरभच्या या संगीतप्रवासाकडे अहमदनगरसह महाराष्ट्रातील रसिकांचे लक्ष लागले आहे. भविष्यातही आपल्या सुरेल आवाजातून तो संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
📲Get App