🔥 TRENDING मंडी के पास गांजा बेचने ग्राहक तलाश रह... गावेराई एसटी, आगारातील आरक्षण केंद्राच... नीतीश कुमार के बेटे निशांत बन सकते हैं... Himachal Pradesh Professor Wins Intern... Actress Tabu to Star in 'Tunnel Men',... Uttarakhand Opens 1,694 Jobs for 12th...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Travel

गेवराई एसटी आगारात आरक्षण केंद्राचे काम रखडले

✍️ Reporter: Ramesh Sukhdev Khandagale 🗓 18 Nov 2026, 05:55 PM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गेवराई एसटी आगारात आरक्षण केंद्राचे काम अजूनही सुरू नाही, ज्यामुळे प्रवाशांना तिकिट आरक्षणात अडचणी येत आहेत.

गेवराई : गेवराई एसटी आगारामध्ये (बसस्थानकात) प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण केंद्र सुरू करण्याची व्यवस्था होऊनही एक वर्ष उलटले, तरी प्रत्यक्ष आरक्षण केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट काढू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेवराई हे तालुक्याचे ठिकाण असून येथून बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर आदी ठिकाणांसाठी दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या मोठी आहे. सण-उत्सव, सुट्टीच्या काळात जागेसाठी धावपळ होते. अशा वेळी आरक्षण केंद्र असते तर प्रवाशांना निश्चित जागा मिळाली असती.

आगारात आरक्षण केंद्रासाठी जागा / काऊंटरची व्यवस्था झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र कर्मचारी नियुक्ती, संगणक यंत्रणा, तांत्रिक जोडणी की वरिष्ठ पातळीवरील परवानगी - नेमके काय अडले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रवाशांची मागणी आहे की, प्रशासनाने याबाबत तातडीने खुलासा करावा आणि आरक्षण केंद्र तात्काळ कार्यान्वित करावे.
आरक्षण केंद्राचे काम अजून सुरू झालेले नाही.

यामुळे आरक्षण केंद्राची सेवा उपलब्ध नाही.
📲Get App