🔥 ट्रेंडिंग सिकंदराराऊ में भीषण सड़क हादसा, ट्रैक्... जैनुद्दीनपुर में जमीन के बैनामों को ले... বাগনান স্বস্তিক সংঘের পূজা ખેરાલુ નગરપાલિકા વોર્ડ 1ની પેટા ચૂંટણી... पूर्व मंत्री के पुत्र ने बाढ़-ग्रस्त द... दिल्ली में CJP के प्रदर्शन पर सुप्रीम...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

गजानन सहकारी साखर कारखान्यात मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ, नारायणगड

✍️ रिपोर्टर: Pranav Gaur 🗓 13 अक्टू. 2026, 12:33 PM 👁 14
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गजानन सहकारी साखर कारखान्यात मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ झाला, ज्यामध्ये क्षेत्रातील प्रमुख ह.भ.प. आणि शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।

आज गजानन सहकारी साखर कारखान्यात मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. श्री प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला।

यावेळी श्री क्षेत्र नवगण राजुरीचे ह.भ.प. श्री अमृताश्रम स्वामी महाराज, श्री क्षेत्र साधक आश्रम टिप्पटवाडीचे ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज, श्री क्षेत्र ढेकळे महाराज संस्थान बेलखंडी पाटोदा येथील ह.भ.प. श्री भक्तीदास महाराज तसेच श्री क्षेत्र रामचंद्र गडाचे ह.भ.प. श्री रामदास महाराज भारती यांची विशेष उपस्थिती लाभली।

या शुभप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी बांधव, राजकीय मार्गदर्शक, सहकारी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।

सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, साखर कारखाना हा शेतकरी, कामगार आणि परिसराच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार आहे। यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होऊन ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना लाभ मिळावा, कामगारांच्या कष्टांना योग्य सन्मान मिळावा आणि कारखान्याची प्रगती अधिक वेगाने व्हावी, हीच सदिच्छा।

सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना, तोडणी-वाहतूक कंत्राटदारांना आणि कारखान्यातील अधिकारी-कर्मचारी यांना यशस्वी गळीत हंगामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या।
📲Get App