🔥 TRENDING India's ODI Calendar Ahead of 2027 Wor... Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
गुहागरमध्ये घरात केवळ तीन महिला असताना मध्यरात्री दारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये घबराट, पिंजरा लावण्याची मागणी
Local

गुहागरमध्ये घरात केवळ तीन महिला असताना मध्यरात्री दारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये घबराट, पिंजरा लावण्याची मागणी

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 02:26 PM 👁 44
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गुहागर-विजापूर महामार्गावरील काजळी गावात मध्यरात्री एका घराच्या दारात बिबट्या वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, घरात केवळ तीन महिलाच राहत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गुहागर-विजापूर महामार्गावरील काजळी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. येथील स्थानिक नागरिक दर्शन चव्हाण यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

चव्हाण कुटुंबातील मुख्य पुरुष कामानिमित्त सध्या बंगळुरू येथे असतात, तर घरी सध्या तीन महिलाच राहतात. यातील एक महिला आजारी असल्याने उपचारासाठी किंवा तातडीच्या कामासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. दारातच बिबट्याचा वावर असल्याने या महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या काळात रात्री आरती व भजनासाठी नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणी वनपाल अमित निमकर यांनी सांगितले की, चव्हाण यांच्या घरामागे जंगल परिसर असून तिथे मानवी वस्ती विरळ आहे. घरात पाळीव कुत्रे व मांजरे असल्याने त्यांच्या शिकारीसाठी बिबट्या तेथे येत असावा. वनविभागाच्या पथकाने बाधित कुटुंबाशी संवाद साधून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आहेत.
📲Get App