जीवनशैली
एसटी कामगारांना दिवाळीपूर्वी थकबाकी, २५ हजारांची दिवाळी भेट द्या; एसटी कामगार संघटनेचे महामंडळाला पत्र.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/१०/२०२६
मुंबई विशेष बातमी :एसटी कामगारांना दिवाळीपूर्वी थकबाकी, २५ हजारांची दिवाळी भेट द्या; एसटी कामगार संघटनेचे महामंडळाला पत्र
ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करून २ टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी अशी मागणी
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ हजार रुपयांची भेट व थकबाकी देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे.
मुंबई : प्रलंबित थकबाकी, ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे आणि २५ हजार रुपयांची दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठविले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी संघटनेने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये महागाई भत्त्याची थकबाकी, घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची मागणी केली आहे.
परिवहन मंत्र्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५८ टक्के महागाई भत्ता, १०, २० आणि ३० टक्के घरभाडे भत्ता तसेच तीन टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करून त्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनासोबत द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. महानगरपालिका, बेस्ट, राज्य विद्युत महामंडळ आणि रेल्वेतील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी भेटीच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही २५ हजार रुपये द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. महामंडळाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी, असे मत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले.