🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एमपीएससी विद्यार्थ्यांनी व्ही. राधा समितीच्या बैठकीला बहिष्कार: राजीनाम्याची मागणी
Local

एमपीएससी विद्यार्थ्यांनी व्ही. राधा समितीच्या बैठकीला बहिष्कार: राजीनाम्याची मागणी

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 16 Sep 2026, 08:08 PM 👁 51
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अमरावतीतील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी व्ही. राधा समितीच्या बैठकीला बहिष्कार जाहीर केला असून, आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

एमपीएससीतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे अमरावतीतील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

ही समिती गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी तत्काळ पदमुक्त व्हावे. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याशिवाय प्रशासन किंवा कोणत्याही समितीसोबत चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर व्ही. राधा समितीच्या बैठकीला उपस्थित न राहता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यभरातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून, प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञांकडून सूचना घेऊन सुधारणा शिफारसी करणार आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई आणि आयोगाची पुनर्रचना करण्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे.
📲Get App