राजनीति
ए आय डेटा सेंटर विरोधात रोहित पवारांचा हल्लाबोल सरकारच्या खोटारडेपणाचा अधिकाऱ्याकडून पडदा पास
काल झालेल्या आंदोलनात अधिकाऱ्याकडून खरी माहिती समोर
उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटर आणि इतर प्रकल्पांना विरोध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (रोहित दादा) आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी काल सोलापूर-पुणे महामार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको केला.
काल झालेल्या या आंदोलनात रोहित दादांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यानच सरकारच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला.
रोहित पवार यांनी थेट आरोप केला की, "मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सामंजस्य करारात (MOU) या प्रकल्पांचा समावेश असताना शासनाकडून खोटी माहिती दिली जात आहे", आणि अशी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.
सरकारने जनसुनावणीपूर्वी कोणतेही काम सुरू न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन काही तासांत मागे घेण्यात आले, मात्र या निमित्ताने सरकारच्याच अधिकाऱ्याने सरकारच्या खोटारडेपणाचा पडदा फाश केल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.
AI डेटा सेंटरमुळे उजनीच्या पाण्यावर आणि शेतकऱ्यांवर परिणाम होईल, असा दावा आंदोलकांचा आहे, तर सरकारकडून हा विकासाचा प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.