Health
डोंबरेवाडीत आता पोल्ट्रीसह बेकायदेशीर 'वराह पालन केंद्राचा' (डुकरांचा फार्म) उच्छाद; तीव्र दुर्गंधीमुळे ग्रामस्थ आक्रमक, साथीचे आजार पसरण्याची भीती!
नीड २४ न्यूज
ठाणे, मुरबाड विशेष वृत्त
दिनांक: २०/१०/२०२६
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे.
तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २०/१०/२०२६
ठाणे,मुरबाड:विशेष वार्ता पत्र
मुरबाड तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत हद्दीतील डोंबरेवाडी गावातील नागरिकांची समस्या आता अधिकच गंभीर झाली आहे. गावात आधीच असलेल्या पोल्ट्री फार्मच्या त्रासात भर पडली असून, आता लोकवस्तीच्या अगदी जवळ सुरू झालेल्या वराह पालन केंद्रामुळे (डुकरांचा फार्म) परिसरात प्रचंड घाण आणि असह्य दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वराह पालन केंद्रामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर माश्या आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात मलेरिया, डेंग्यू आणि पोटाचे गंभीर आजार पसरण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत असून, दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी आता हे वराह पालन केंद्र आणि पोल्ट्री फार्म तात्काळ गावातून हटवण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप!
या दुहेरी संकटामुळे त्रस्त झालेल्या डोंबरेवाडीच्या आदिवासी नागरिकांनी मुरबाडचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO), स्थानिक पोलीस आणि तुळई आरोग्य केंद्राला लेखी निवेदने दिली आहेत. कोळोशी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनाही वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, या बेकायदेशीर वराह पालन केंद्रावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा:
"गावाच्या मध्यभागी अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळू दिला जाणार नाही," असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे वराह पालन केंद्र आणि पोल्ट्री बंद न केल्यास, संपूर्ण डोंबरेवाडी ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी 'नीड २४ न्यूज'च्या माध्यमातून दिला आहे.