🔥 TRENDING शुम्भेश्वरनाथ मंदिर के मुख्य द्वार पर... पशुपालकांसाठी मोठी संधी! ‘मुख्यमंत्री... 6y8d9i छत्रपती संभाजीनगरमध्ये द रिअल पँथर ऑफ... વાઘોડિયા-ડભોઈ રિંગ રોડ પર નવા વર્ષની ભ... Kerala Government Rewards Informants i...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-930 वर चिचपल्ली गावाजवळील दूध नाला परिसरात गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या दरम्यान ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला.

✍️ Reporter: Doctor Pintu Paul 🗓 28 Nov 2026, 12:06 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मानवी जीवन अनमोल आहे. महामार्गावरील निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

चिचपल्लीजवळ NH-930 महामार्गावर भीषण अपघात; तिरुपती कांडुबे यांचा मृत्यू, नितेश गिरे गंभीर जखमी

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; वेगनियंत्रक फलक लावण्याची नागरिकांची मागणी

चिचपल्ली | NEED 24 NEWS

चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-930 वर चिचपल्ली गावाजवळील दूध नाला परिसरात गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या दरम्यान ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तिरुपती कांडुबे (वय 33, रा. जिवती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितेश गिरे (वय 20) हे गंभीर जखमी झाले.

अपघातात सहभागी ट्रकचा क्रमांक MH-34 BG 8086 असल्याची माहिती आहे. ट्रकचालक लक्ष्मण यादव घुगरे, रा. संजय नगर, चंद्रपूर यांच्या सांगण्यानुसार, ते चंद्रपूरकडून ट्रक घेऊन येत असताना दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी ट्रकच्या अगदी जवळ आली आणि अपघात घडला. दुचाकीस्वाराने सुरक्षित अंतर राखून ओव्हरटेक केले असते, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, असे ट्रकचालकाचे म्हणणे आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

महामार्ग प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!

NH-930 महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अपघातांचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः चिचपल्ली परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, वेगनियंत्रक फलक लावावेत, ओव्हरटेकिंगबाबत सूचना फलक बसवावेत तसेच अपघातप्रवण ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मानवी जीवन अनमोल आहे. महामार्गावरील निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
📲Get App