🔥 TRENDING कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई; १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघे ताब्यात

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई; १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघे ताब्यात

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 19 Sep 2026, 02:20 PM 👁 58
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

चाळीसगाव : प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात चाळीसगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १६ लाख ९९ हजार ८९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिली कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. प्रभारी अधिकारी अमितकुमार फटके यांच्या पथकाला हिरापूर रोड परिसरात अवैध गुटखा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात निखिलेश सुनील केवळे (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयशर वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. या कारवाईत MH-48-AY-2468 क्रमांकाच्या आयशर वाहनासह मधुकर धाडू इमके (वय ४८, रा. खेडी शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३३२/२०२६ दाखल करण्यात आला असून वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई पार पाडली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.
📲Get App