🔥 ट्रेंडिंग कर्नाटक में वोटर्स की हटाने को लेकर डी... रेलवे NTPC ग्रेजुएट स्तर पर 3477 पदों... कर्नाटक से पानी की आपूर्ति में अनिश्चि... लेफ्ट जनरल करनबीर ब्रार (सेवानिवृत्त)... राजस्थान बोर्ड कक्षा 10 परीक्षा दो बार... 21 अक्टूबर को दशमी पर रिलायंस जियो IPO...
05 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
बोदर्डे दुध उत्पादक संस्था लि च्या चेअरमन व्हाईस चेअरमन.पदी बिनविरोध निवड

बोदर्डे दुध उत्पादक संस्था लि च्या चेअरमन व्हाईस चेअरमन.पदी बिनविरोध निवड

✍️ रिपोर्टर: Vilas Supadu Patil 🗓 05 अक्टू. 2026, 06:12 PM 👁 22
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चेअरमन पदी श्री विशाल सुनील पाटील व्हाईस चेरमन पदी श्री शांताराम सदा भिल

बोदडें दूध उत्पादक सहकारी संस्था लि. च्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड श्री विशाल सुनिल पाटील यांची चेअरमनपदी तर श्री शांताराम सदा भिल यांची व्हा.चेअरमनपदी निवड


गावातील बोदडें दूध उत्पादक सहकारी संस्था ली बोदर्डे, तालुका भडगाव यांच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड झाल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आली.

संस्थेच्या चेअरमनपदी श्री विशाल सुनिल पाटील यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री शांताराम सदा भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घेण्यात आलेल्या संचालक मंडळ बैठकीत ही निवड एकमताने संपन्न झाली. या वेळी संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी कर्मचारी.व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नवनिर्वाचित चेअरमन श्री विशाल सुनिल पाटील यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

बोदर्डे गावातील निवडीचे शेतकरी दूध उत्पादक सभासद तसेच ग्रामस्थांनी स्वागत करून दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी तसेच दूध व्यवसाय वाढीसाठी दोन्ही पदाधिकारी मोलाची कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





नवीन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध संपन्न.

संस्थेच्या सभासद व गावकऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
📲Get App