🔥 TRENDING 8-Year-Old Shepherd Ramayya Reunited w... Fact Check: AI‑Generated Video Shows A... Indian Man's Viral Comparison of Austr... Singaporean Photographer Turns Adolesc... Filmmaker John Wilson Redefines Modern... Madarangi Mallikarjuna's 'Huli Beera'...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

बदलापूर-अंबरनाथच्या विकासाला गती; आमदार किसनजी कथोरे यांच्या उपस्थितीत MMRDA अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 01 Oct 2026, 06:00 PM 👁 72
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक १/१०/२०२६.
विशेष वार्ता Need 24News.
बदलापूर-अंबरनाथच्या विकासाला गती; आमदार किसनजी कथोरे यांच्या उपस्थितीत MMRDA अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न
मुरबाड / बदलापूर (प्रतिनिधी):
बदलापूर आणि अंबरनाथ शहरांच्या भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या उपस्थितीत MMRDA च्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक सविस्तर आढावा बैठक १ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाली.
बदलापूर-अंबरनाथ परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील वाढता ताण आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विचार करून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा या वेळी प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. यामध्ये नवीन प्रस्तावित उड्डाणपूल, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक व्यवस्था सुधारणा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे.
या विविध विकासकामांचे डीपीआर (DPR) आता पूर्णपणे तयार झाले असून, संबंधित प्रकल्पांना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पांच्या तांत्रिक व प्रशासकीय बाबी, आवश्यक मंजुरी आणि पुढील कार्यवाहीबाबतचा आढावा आमदार कथोरे यांनी या वेळी घेतला.
बदलापूर व अंबरनाथ शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास व्हावा, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि विशेषतः वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करता याव्यात, यासाठी शासनाच्या संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. प्रस्तावित विकासकामे केवळ कागदावर न राहता त्यांना प्रत्यक्ष कामाची दिशा मिळावी आणि नागरिकांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यावर या बैठकीत आमदार किसनजी कथोरे यांनी विशेष भर दिला.
📲Get App