🔥 ट्रेंडिंग गुजरात एटीएस ने वडोदरा आईएएफ बेस की शू... आंध्र प्रदेश के नेताओं ने मोदी सरकार म... गुजरात के कपास खेत में 161 गांजा पौधे,... भाजपा ने गुजरात के 182 विधानसभा क्षेत्... गुजरात एटीएस ने जेईएम संदिग्ध को एके‑4... অন্যায়ের বিরুদ্ধে প্রতিবাদে সত্যের মু...
28 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

बारामती पोलिसांचा धडाका! अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; पाच गावठी पिस्तुले जप्त!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 28 नव. 2026, 12:19 AM 👁 53
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

छाप्यांदरम्यान पाच गावठी पिस्तुले जप्त करण्यात पोलिसांना यश

बारामती पोलिसांचा धडाका! अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; पाच गावठी पिस्तुले जप्त!

गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे; अवैध शस्त्रसाठा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश

बारामती : बारामती शहरात अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकत तब्बल पाच गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बारामती शहर व परिसरात अवैध शस्त्र बाळगण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांदरम्यान पाच गावठी पिस्तुले जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईमुळे बारामती परिसरातील अवैध शस्त्र बाळगण्याच्या प्रकारांवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तपास आणि कारवाई सुरू आहे.
📲Get App