🔥 TRENDING Bank unions postpone three‑day nationw... Uttar Pradesh sugar production falls s... Baba Mahakal adorned with silver crown... Congress Reviews Local Body Election L... மின்கம்பம் சரிந்து ஐந்து வயது குழந்தை... कार्य
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच विघ्नहर्ता चौकात आक्रोश; २८ वर्षीय आईने ५ वर्षाच्या शौर्यासह संपवला संसार.....!

बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच विघ्नहर्ता चौकात आक्रोश; २८ वर्षीय आईने ५ वर्षाच्या शौर्यासह संपवला संसार.....!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 15 Sep 2026, 06:24 AM 👁 54
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

सीमेवर जवान देशाची राखण करतोय, इकडे काळाने घरावरच घाला घातला

जळगाव : गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना जळगाव शहरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौक परिसरात एका २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये हेमांगिनी निखील महाजन (वय २८) आणि त्यांचा मुलगा शौर्य (वय ५) यांचा समावेश आहे. महाजन कुटुंब हे परिसरात अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी ओळखले जाते.

पती राजस्थान सीमेवर तैनात

या घटनेला अधिक वेदना देणारी बाब म्हणजे हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय लष्करात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे देशसेवेत तैनात आहेत. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी घराच्या खालच्या मजल्यावर हेमांगिनी आणि शौर्य हेच दोघे होते, तर कुटुंबातील इतर सदस्य वरच्या मजल्यावर होते. सायंकाळच्या सुमारास सासू खाली आल्या असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. बराच वेळ हाका मारूनही प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. आतमध्ये पाहिलेले दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

ज्या वयात शौर्यच्या हातात बाप्पाचा प्रसाद आणि खेळणी हवी होती, त्याच निरागस वयात त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. त्याची काय चूक होती, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

हेमांगिनी यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
📲Get App