🔥 TRENDING बीदर में जिला पंचायत में एससी आरक्षण क... ದಾವಣಗೆರೆ ವಿವಿ: ಎಸ್‌ಇಪಿ ಪದವಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ... ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಪಾಲರಾಗಿ ಡಾ. ಸುಧಾ ಯಾದವ್ ಜ... मुख्य कार्यपालन अधिकारी ने खरों ग्राम... मुख्य कार्यपालन अधिकारी ने खरों ग्राम... गढ़वा में ब्राउन शुगर के अवैध कारोबार...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे - कासोदा येथे सेविकांचा सन्मान सोहळा

बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे - कासोदा येथे सेविकांचा सन्मान सोहळा

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 Oct 2026, 07:25 PM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

कासोदा, ता. एरंडोल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनसेवेची 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजप एरंडोल तालुका कासोदा मंडळाच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कासोदा येथील श्रीराम मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कासोदा-आडगाव जिल्हा परिषद गटातील एकूण 86 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्येची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि संगोपन या क्षेत्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी समाजातील विविध घटकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि सेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हाच सेवा संकल्प अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.

या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस ऋषिकेश पाटील, जि. प. सदस्या महानंदाताई पाटील, डॉ. डी. आर. पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सरपंच संजय चौधरी, भूषण पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, डॉ. निरुद्दीन मुल्लाजी, मुजफ्फर अली, दीपक राजपूत, सुरेश (छोटू) क्षीरसागर, पत्रकार सागर शेलार, अजय मोरे, मुकेश पारधी, सचिन पाटील (सरपंच, उमरे), आधार चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
📲Get App