🔥 TRENDING Kempegowda International Airport Tops... पटना में छात्रों ने SIR व ज्ञानेश कुमा... महथावा के सार्वजनिक दुर्गा मंदिर के पं... Indian Railways Launches IRCTC Super A... മഹിളാ മോർച്ച പ്രതിഷേധ സമ്മേളനം നാളെ. Chickpea Sowing Gains Momentum in Nort...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भास्कर मुकुंद आगिवले ४ दिवसांपासून बेपत्ता; शोध घेण्याचे मुरबाड पोलिसांसमो.र आव्हान

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 13 Oct 2026, 07:00 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भास्कर मुकुंद आगिवले ४ दिवसांपासून बेपत्ता; शोध घेण्याचे मुरबाड पोलिसांसमोर आव्हान
मुरबाड:

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक १४/१०२०२६.
मुरबाड वृत्त :
मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील रहिवासी भास्कर मुकुंद आगिवले हे गेल्या ४ दिवसांपासून गूढरीत्या बेपत्ता झाले आहेत. ११ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेल्या आगिवले यांचा सर्वत्र शोध घेऊनही अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता अत्यंत वाढली असून, स्थानिक पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी वेगाने चक्रे फिरवावीत, अशी मागणी होत आहे.
मुरबाड नगरपंचायतीच्या पाठीमागे शेवटचे पाहिले
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी भास्कर आगिवले हे अचानक बेपत्ता झाले. त्यांना शेवटचे मुरबाड नगरपंचायतीच्या पाठीमागील बाजूस काही नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर ते कुठल्या दिशेला गेले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ४ दिवस उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा हे इसम कुठेही आढळल्यास त्वरित मुरबाड पोलीस स्टेशन येथे किंवा ९३२५६५३०७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— नीड २४ न्यूज वृत्तसेवा
📲Get App