🔥 TRENDING વાઘણીયા બૃહદ ગીરમાં બાયોમેડિકલ વેસ્ટ પ... Kripya karke yahan per 12 to traffic p... Delhi Student Stabbed in Neck After Ni... गुरुद्वारा साहिब में गुरु नानक देव जी... मौलाना मजहरुल हक टीचर्स ट्रेनिंग कॉलेज... Liquor Contractor Charged with Rape of...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोरमध्ये संविधान दिनाचा उत्सव: समता सैनिक दलाने दिली मानवंदना, आंबेडकरवादी संघटनेचे लाडू वाटप

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 27 Nov 2026, 01:23 PM 👁 32
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर शहरात २६ डिसेंबरला संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला; समता सैनिक दलाने शिस्तबद्ध मानवंदना अर्पण केली व आंबेडकरवादी युवा संघटनेने नागरिकांना लाडू वाटप केले.

भोर, संविधानाच्या मूल्यांचा जागर करीत भोरमध्ये २६ डिसेंबरला संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भोर बसस्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात आली.

संविधान स्तंभाजवळ समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध संचलन व सलामी देत भारतीय संविधानाला मानवंदना अर्पण करण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस निरीक्षक निलेश माने आणि भोर तालुक्यातील आंबेडकर अनुयायींची मोठी संख्या उपस्थित होती.

उपस्थितांनी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

आंबेडकरवादी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, अनिकेत जाधव, सागर यादव आणि स्वप्नील सावंत यांच्या वतीने उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.
📲Get App