🔥 TRENDING Bihar husband says wife left him after... સાબરકાંઠામાં ગાંભોઈ પોલીસે વિદેશી દારૂ... PM Modi launches India Mobile Congress... Bihar CM’s comment on molestation vide... Seemapuri Building Collapse Shakes Del... Police and Forest Dept. Seize 23 Teak...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भोरमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांचे काम बंद आंदोलन सुरू

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 08 Oct 2026, 01:00 PM 👁 20
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ग्राम रोजगार सहाय्यकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भोरमध्ये काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भोर : प्रतिनिधी :- भोरमध्ये ग्रामरोजगार सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असून, तहसील कार्यालयासमोर मंगळवार (दि. ६) निदर्शने करण्यात आली. गेल्या २४ महिन्यांपासून वैयक्तिक खात्यांवर मानधन जमा झाले नसल्याने ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सचिव योगेश किंद्रे यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील ग्रामरोजगार सहायक गेले २४ महिने मानधनावर प्रामाणिकपणे काम करूनही अद्याप शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. दि. ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार गेल्या २४ महिन्यांचे थकीत मानधन मिळाले पाहिजे. रोजगार सहाय्यक हा अर्धवेळ कर्मचारी असल्याने त्याला दुसरीकडे कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कामाचे तास निश्चित करणे, संरक्षण कवच मिळावे, कामाचा मोबदला वाढवणे आणि इतर सेवा-सुविधांचा समावेश आहे. शासनाकडून या मागण्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे आंदोलकांनी म्हटले आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन जोपर्यंत वैयक्तिक खात्यावर मानधन वितरित होत नाही, तोपर्यंत ६ ऑक्टोबर २०२६ पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे या वेळी अध्यक्ष जितेंद्र खोपडे, सचिव योगेश किंद्रे, उपाध्यक्ष दत्तात्रय कामथे, सल्लागार दीपक पारठे, शरद मळेकर, रूपाली खोपडे, दशरथ कुडले आदींसह संघटनेचे सभासद उपस्थित होते.
📲Get App