स्थानीय
भोरमध्ये बालविवाहमुक्त भारत अभियान व अमली पदार्थांविरोधात जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
यहाँ देखें:
▶️ YouTube
भोर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी सेवा समिती, भोर बार असोसिएशन आणि श्री. काशिनाथराव खुटवड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हातवे बु. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यालयात बालविवाहमुक्त भारत अभियान तसेच अमली पदार्थांचा गैरवापर व अवैध तस्करी या विषयांवर कायदेविषयक जनजागृतीपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. श्री. दत्तात्रय उरणकर होते. यावेळी बालविवाहमुक्त भारत अभियान या विषयावर ॲड. श्री. यशवंत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालविवाहाचे सामाजिक दुष्परिणाम, बालकांचे अधिकार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजाची भूमिका याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अमली पदार्थांचा गैरवापर व अवैध तस्करी या विषयावर भोर मधील हरजीवन हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. श्री. अमित शेठ यांनी मार्गदर्शन केले. अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके तसेच तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती केली.
भोर वकील संघटनेचे वरिष्ठ सदस्य ॲड. श्री. शिवाजी मरळ यांनी देखील आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे शाळेमधील दोन छोट्या चिमुकल्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भोर वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. श्री. राकेश कोंडे, ॲड. श्री. विजय दामगुडे, ॲड. श्री. धनंजय दुधाने, ॲड.श्री. सुरज वीर तसेच हरजीवन हॉस्पीटलचे डॉ. श्रेया पारेख व न्यायालयीन कर्मचारी श्री. कैलास आखाडे उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती छाया खुटवड, सहशिक्षक श्री. अशोक मोहिते, श्री. शिवाजी ढेकाने, श्री. रमेश टकले, श्री. संतोष पवार, श्री. कृष्णा तामकर, श्री. ज्ञानेश्वर नेवसे, श्रीमती. वंदना गोरड व श्रीमती. दिपाली खुटवड यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच बालविवाहमुक्त आणि अमली पदार्थमुक्त समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सामाजिक अनिष्ट प्रथा व व्यसनाधीनते विरोधात जागरूक राहून समाजात जनजागृती करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा लाभ १५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतला.