🔥 TRENDING कलेक्टर ने संविधान दिवस पर संविधान की... મુખ્યમંત્રી ભૂપેન્દ્રભાઈ પટેલે સેન્ટ્ર... મટોડા GIDC નજીક ગમખ્વાર અકસ્માત: ટ્રકન... ચરલ ગામે સાણંદ તાલુકા ભરવાડ સમાજ નુ સ્... Kerala Dairy Startup Turns Dream into... Kerala Leader's 'Court Punished None'...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोरमधील तांभाड गावातील मादगुडेवाडी येथील चार घरांना भीषण आग

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 26 Nov 2026, 12:42 PM 👁 61
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर तालुक्यातील मादगुडेवाडी (तांभाड) येथे लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्य, वस्तू आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तरुणांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग अधिक पसरून मोठे नुकसान होण्याचा धोका टळला.

या आगीत बाधित झालेल्या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या संसाराचा मोठा आधार आगीत भस्मसात झाला आहे. प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नागरिकांकडून अशी मागणी होत आहे.
📲Get App