🔥 ट्रेंडिंग गढ़मुक्तेश्वर में सरकारी भूमि पर कथित... किशोरी रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी की ह... दिल्ली रेस्तरां में आग: पिता ने टॉडलर... दिल्ली के कई स्कूलों को ई‑मेल ब bomb ध... कांग्रेस प्रत्याशी संगीता बेनीवाल को ज... इंदौर में 74 साल पुराना मल्हारगंज थाना...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

भोर येथील गावदेवी आई जानाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक आरास

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 15 अक्टू. 2026, 11:28 AM 👁 12
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर येथील गावदेवी आई जाणाई माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चौथ्या दिवशी आकर्षक आरास करण्यात आली असून, भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

भोर येथील गावदेवी आई जाणाई माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चौथ्या दिवशी सुंदर अशी आरास करण्यात आली होती. मंदिराला बाहेरून फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.

या उत्सवानिमित्त मंदिरात महिला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई यामुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. आई जाणाईच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक येत आहेत.
📲Get App