🔥 ट्रेंडिंग अशोकनगर: कलेक्टर साकेत मालवीय ने खाद व... સુરતમાં વંદે ભારત ટ્રેન પર પથ્થરમારામા... मतदाता जागरूकता सर्वोदय कप: क्रिएटर्स... छत्रपती संभाजीनगर में 41 एकड़ धार्मिक... Anthropic Unveils Claude Duet AI for S... मुख्यमंत्री सम्राट चौधरी ने 211 महाविद...
24 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

भोर तालुक्यातील सहा मतदान केंद्रांवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणारl

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 23 अक्टू. 2026, 01:06 PM 👁 92
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी एकूण सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, विविध उमेदवारांमध्ये निवडणूक लढवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भोर शहरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि नसरापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा वापर करण्यात येणार असून, येथे पदवीधर मतदानासाठी प्रत्येकी दोन आणि शिक्षक मतदानासाठी एक असे एकूण सहा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

मतदारसंख्येचा विचार करता, भोर तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी एकूण २ हजार ८४ मतदार नोंदणीकृत आहेत. तर, शिक्षक मतदार संघासाठी एकूण ३६५ मतदार मतदान करणार आहेत.

या निवडणुकीत उमेदवारांची मोठी फळी रिंगणात असून, पदवीधर मतदार संघासाठी ४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच, शिक्षक मतदार संघासाठी ३० उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
📲Get App