🔥 ट्रेंडिंग नई दिल्ली: पूसा परिसर में प्रधानमंत्री... बीदर जिले में पुलिस की बड़ी कार्रवाई:... बीदर जिले के हुलगुत्ती गांव में अवैध श... केल्हारी थाना में शांति समिति की बैठक:... बीदर जिले के हुलगुत्ती गांव में अवैध श... देहरादून: अंतर्राष्ट्रीय बालिका दिवस प...
12 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

भोर पोलिसांकडून ५ कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उघडकीस; पाच जणांना अटक

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 12 अक्टू. 2026, 11:52 AM 👁 40
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथून पुणेकडे तस्करीसाठी नेण्यात येत असलेली ५ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुद्देमालाची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

भोर पोलिसांनी शनिवारी (दि. १०) नाकाबंदी दरम्यान एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथून व्हेल माशाची उलटी (वांती) दोन चारचाकी वाहनांमधून पुणे शहराकडे घेऊन जात असताना पोलिसांनी पाच संशयितांना रंगेहाथ पकडले. महाड नाका परिसरात संशयित वाहनांची तपासणी केली असता, पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी संशयित वाहनांची कसून तपासणी केली असता, त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुमारे पाच किलो वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली. सुरुवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तस्करीची कबुली दिली. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी इकबाल दाऊद पठाण (वय ७२), मोहम्मद रहीमसाब बागवान (वय ३६), किरण नरेश हेदुकर (वय ३६), अभिजीत अशोक हेदुकर (वय ३६) आणि निलेश नरेश हेदुकर (वय ३९) या पाच जणांना अटक केली आहे. हे सर्वजण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळा येथील रहिवासी आहेत.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक केलेल्या पाचही तस्करांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपवनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वनपाल रोहन इंगवले आणि इतर वनकर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📲Get App