🔥 ट्रेंडिंग राष्ट्रपति मुर्मु ने बिहार में बच्चों... बीजेपी ने बायस एमएलसी चुनाव में जैन सु... सर्जित भल्ला की SIR गणना में 13 करोड़... जिओ प्लेटफॉर्म्सने IPO जाहीर केला: रिल... न्यूज़18 मराठी ने महाराष्ट्र राजनीति प... महाराष्ट्र ने फॉर्म 6 सुधारने के लिए ई...
18 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

भोर मांढरदेवी रस्त्यावरील वनक्षेत्र हद्दीतील खड्डेमय असणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 18 अक्टू. 2026, 11:22 AM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर-कापूरहोळ-मांढरदेवी रस्त्याचे काम गेली तीन वर्ष चालू आहे आता सध्या शारदीय नवरात्र उत्सव चालू असताना आपण पाहतोय मांढरदेव गडावर काळुबाईच्या दर्शनाला राज्यातून विविध ठिकाणाहून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात यामुळे सर्वांना खूपच अडचणींना सामोरे जावे लागते या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत याबरोबरच खडी वर आल्याने दोन चाकी वाहने घसरण्याची आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे याबरोबरच चारचाकी वाहणांना यातून रस्ता काढत जाण्यासाठी त्रासदायक ठरत आहे या रस्त्यावरील गोकवडी जवळील अर्धा किलोमीटर तसेच घाटातील साडेतीन किलोमीटरचा रस्ता या वनपरीक्षेत्र हद्दीत असल्यामुळे रखडलेला आहे वारंवार नागरिकांकडून सांगण्यात येऊन देखील याकडे प्रशासन जाणून-बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून ताबडतोब रस्ता पूर्ण करण्याची मागणी होत आहे यावर्षी येणाऱ्या जानेवारी महिन्यात मांढरदेवीची यात्रा येत आहे सबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्याबाहेरूनही या ठिकाणी भक्तगण येत असतात यामुळे या रस्त्यावर फार मोठ्या वाहनांची रहदारी होत असते या अगोदर तरी या रस्त्याचे काम पूर्ववत व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे.
📲Get App