🔥 TRENDING PM Modi Promises Full Support to Manip... Manipur death toll climbs to nine, CM... Rare Golden Cat Spotted in Meghalaya’s... Mamata Banerjee likens her detention t... Shillong Teer Winning Numbers Released... Tripura allocates Rs 1.29 crore for ro...
11 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर-मांढरदेवी मार्गावरील गोकवडी,आंबाडखिंड घाटातील स्त्याचे काम अखेर अर्धवट

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 11 Oct 2026, 09:30 AM 👁 20
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वाहतुकीला अडथळा - संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष

कापूरहोळ- भोर -मांढरदेवी मार्गाच्या नूतनीकरणाचे जवळजवळ ३३ किलोमीटरचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी भोर-मांढरदेवी मार्गावरील गोकवडी जवळील अर्धा किलोमीटर तर आंबाडखिंड घाटातील ३ किलोमीटरचे काम वनविभागाच्या हरकतीमुळे तसेच ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे.दरम्यान या मार्गांवरून विसगाव खोऱ्यातील तसेच काळुबाई देवीला जाणाऱ्या हजारो वाहनांची दररोज वाहतूक सुरू असते.वाहनचालकांना या रखडलेल्या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने वाहनचालकांकडून, काळुबाई देवीला ये-जा करणाऱ्या भाविक- भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कापूरहोळ पासून वाई तालुक्याच्या हद्दीपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.मात्र आंबाडखिंड घाटातील व निळकंठ -गोकवडी जवळील रस्त्याचे काम दुरावस्थेत असून संबंधित ठेकेदाराकडून हा रस्ता खोदून ठेवला गेला आहे.या दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे तर अनेकदा छोटे- मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. मागील दीड वर्षापासून भोर -मांढरदेवी मार्गावरील दोन ठिकाणच्या रस्त्याचे काम अर्धवट राहिले असून याकडे ना प्रशासन, ना ठेकेदार लक्ष देत आहेत. वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची वारंवार संपर्क साधला असता रस्त्याचे काम करण्यात येणार आहे, थोडा वेळ लागेल, तात्पुरते या रस्त्यावर मुरूम टाकून सपाटीकरण करून देतो असे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत असते. मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण होत नसल्याने नागरिकांची तसेच वाहनचालकांची दिशाभूल केली जात असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास सूचना देऊन दुरावस्था झालेल्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम-खडी टाकून सपाटीकरण करावे अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
📲Get App