🔥 TRENDING Actor Lakshmipriya Booked Over Alleged... Bank Unions Postpone Nationwide Strike... Amar Ujala Releases Daily News Bulleti... UK Detains 5 Over Alleged Plot to Atta... Ambajogai Housebreak: Two Arrested wit... 11 Arrested for Mobile Theft During Pu...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या दोन तरुणांचा बायपासवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे ठार....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 24 Sep 2026, 03:58 PM 👁 36
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - लहान बहिणीची भेट घेऊन मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा अपघात २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पाळधी ते तरसोद बायपासवरील आसोदा उड्डाणपुलाजवळ घडला.

अपघातातील मृतांची नावे -
१) पवन अनिल चौधरी (वय २९)
२) युवराज भिका सोनवणे (वय ३४, दोघे रा. बिरोदा, जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बिरोदा येथील पवन चौधरी हा त्याचा मित्र युवराज सोनवणे याच्यासोबत दुचाकी (क्र. एमपी ६८, झेडडी ९२३२) वरून यावल तालुक्यातील पाडळसे येथे लहान बहिणीला भेटण्यासाठी आला होता. सायंकाळी लहान बहिणीची भेट घेतल्यानंतर दोघेही सुरत येथे वास्तव्यास असलेल्या पवनच्या मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी रवाना झाले.

जळगावनजीक तरसोद ते पाळधी बायपास मार्गावरून जात असताना आसोदा उड्डाणपुलाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

या धडकेत पवन चौधरी याचा जागेवरच मृत्यू झाला, तर युवराज सोनवणे हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दोघांना तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना युवराजचाही मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी मयत पवनचा नातेवाईक कुमुद अनिल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, अवघ्या काही तासांपूर्वी लहान बहिणीची भेट घेऊन आनंदात निघालेल्या पवनचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याची ती भेट अखेरची ठरली. या घटनेमुळे चौधरी आणि सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
📲Get App