🔥 TRENDING Suraj Venjaramoodu Unveils 'Khushpu' F... Tamil Nadu Shuts Prison-Run Fuel Stati... भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिन... MP Minister Alleges Congress Involved... MP Enrolls 1.2 Crore Farmers in AgriSt... तीन वार्डों में चुनावी उम्मीदवारों पर...
03 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

भूमिपूजन; कार्य सम्राट आमदार किसन जी कथोरे साहेब यांच्या हस्ते ७ कोटींच्या कामाचा शुभारंभ.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 02 Nov 2026, 10:37 PM 👁 65
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मोरोशी-न्याहाडी रस्त्यावरील काळू नदीवर नवीन पुलाचे भूमिपूजन; आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ७ कोटींच्या कामाचा शुभारंभ
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
मुरबाड (प्रतिनिधी) / नीड २४ न्यूज महाराष्ट्र:
दिनांक ३/११/२०२६.
मुरबाड तालुक्यातील मोरोशी-न्याहाडी मार्गावरील काळू नदीवर नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे परिसरातील हजारो नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, त्यांच्या धोकादायक प्रवासाला पूर्णविराम मिळणार आहे.
जुना पूल ठरत होता मृत्यूचा सापळा
सध्या अस्तित्वात असलेला जुना पूल अत्यंत कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात थोडासा जरी पाऊस झाला, तरी काळू नदीचे पाणी पुलावरून वाहू लागत असे. यामुळे न्याहाडी, मेर्दी, वाल्हीवरे, खुटल, तळेगाव भागात जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती. या पुलावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.
आमदार श्री किसनजी कथोरें साहेब यांच्या पाठपुराव्याला यश
नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदारश्री किसनजी कथोरेसाहेब यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे या ठिकाणी नवीन उंच व रुंद पुलाच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन पुलाची उंची जास्त असल्याने पूरपरिस्थितीमध्येही वाहतूक सुरक्षित राहील, तसेच रस्ता सरळ होणार असल्याने येथील प्रवास गतिमान व सुरक्षित होणार आहे.
"जुना पूल कमी उंचीचा असल्याने दर पावसाळ्यात जनतेचे प्रचंड हाल होत होते. हा नवीन पूल या भागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी वरदान ठरणार आहॆ.
कार्यक्रमास मान्यवरांची मोठी उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी विलासकाका देशमुख, सुहास मोरे, दीपक पवार, प्रकाश पवार, अनिल घरत, संतोष भांगरथ, अभिजित घोलप, काळूराम घोलप, गोविंद भला, संतोष देशमुख, राजेश देशमुख, राहुल पवार, पिंटू पठारे, सचिन देशमुख, संकेत देशमुख, रमेश उघडा, सिमाताई घरत, नंदाताई उघडा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे, उदयोजक श्री. औटी तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
📲Get App