🔥 TRENDING mathura vrindavan मथुरा में दीपावली से... Heavy Snowfall Triggers Landslide Warn... Five dead, three injured in car‑tree c... Political Contest Intensifies in Uttar... Police Reveal Wife Knew Husband’s Moti... Journalists Hold Angry Protest in Amri...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघड; १००० रुपयांची लाच घेताना शिपाई आणि सायबर कॅफे चालकाला अटक....!

भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघड; १००० रुपयांची लाच घेताना शिपाई आणि सायबर कॅफे चालकाला अटक....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 17 Oct 2026, 11:52 AM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ : शासकीय शुल्क भरूनही शेतमोजणीचे काम करण्यासाठी लाच मागणाऱ्या भुसावळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एका खासगी सायबर कॅफे चालकालाही अटक करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन किसन पाटील (शिपाई, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भुसावळ) आणि राकेश रामदास चव्हाण (खासगी इसम, सायबर कॅफे चालक, भुसावळ) अशी आहेत.

तक्रारदाराची शेतजमीन मौजे गोजोरे, तालुका भुसावळ शिवारात आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेमधून ऑनलाईन अर्ज केला होता आणि त्यासाठीचे २,००० रुपयांचे शासकीय चलन देखील भरले होते.

त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी तक्रारदाराला त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झाला. याबाबत त्यांनी सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, चव्हाण याने भूमी अभिलेख कार्यालयातील सचिन पाटील यांच्याशी बोलणे झाले असून काम मार्गी लागेल, असे सांगितले.

दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी राकेश चव्हाण याने तक्रारदाराला फोन करून त्रुटी पूर्ततेच्या नावाखाली शिपाई सचिन पाटील याच्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाच मागणीचे सत्य समोर आले.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सापळा रचला. जामनेर रोडकडून हनुमान नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या नेहते हॉस्पिटलजवळ राकेश चव्हाण याने शिपाई सचिन पाटील यांच्यावतीने तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे एसीबीने कळवले आहे.
📲Get App