🔥 TRENDING सिकंदरा राऊ के गांव बिलार के पास भीषण... बिजुरी में संदिग्ध परिस्थितियों में मि... સાવરકુંડલા બાયપાસ રોડ પર કાર‑ડમ્પર અથડ... વિજયનગરમાં શાળાની લૂંટ અને ઘરફોડમાં ગે... Video:ವಿಬಿಜಿ ರಾಮ್ ಜೀ ಯೋಜನೆ ಬಗ್ಗೆ ನೀರ್... Sikkim Sports Minister Launches 45‑km...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोंगवलीत शासनाचा बंधारा बुजवल्याचा आरोप; पुणे ट्रान्समिशन कंपनीवर कारवाई होणार का? बाळासाहेब शेडगे यांची कृषी विभागाकडे तक्रार;

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 19 Nov 2026, 07:29 PM 👁 100
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी, बंधारा आढळला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

भोंगवली | भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोंगवली येथे गट क्रमांक १९३ आणि १९९ मधील शासनाने बांधलेला बंधारा पुणे ट्रान्समिशन कंपनीने कोणतीही आवश्यक परवानगी न घेता बुजवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे तसेच वन्यजीवांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणी बाळासाहेब शेडगे यांनी कृषी विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आज, दि. १७ नोव्हेंबर रोजी कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनाही संबंधित ठिकाणी बंधारा आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला बंधारा नेमका कोणी आणि कोणत्या परवानगीच्या आधारे बुजवला? यासाठी संबंधित विभागाची मंजुरी घेण्यात आली होती का? तसेच बंधारा बुजवल्यामुळे परिसरातील शेती, पाणीसाठा आणि वन्यजीवांवर झालेल्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळत होता. मात्र, तो बुजवण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून, वन्यजीवांच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या परिसरातील जमीन, उत्खनन आणि औद्योगिक कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. आता शासनाच्या बंधाऱ्याचा विषय समोर आल्याने प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

शासनाचा बंधारा बुजवणाऱ्यांना अभय कोणाचे?

सामान्य नागरिकांनी शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केले तर त्यांच्यावर तातडीने कारवाई होते; मग शासनानेच बांधलेला बंधारा बुजवण्याचा प्रकार घडला असेल, तर संबंधितांवर कारवाई करण्यास प्रशासनाला अडचण काय? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

आता कृषी विभागाच्या स्थळ पाहणीनंतर पुढे कोणती कार्यवाही होते, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करतात का आणि शासनाच्या बंधाऱ्याचे नुकसान करणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे भोंगवली ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📲Get App