स्थानीय
भोंगवलीत सबस्टेशन आणि टॉवर लाईनविरोधात ग्रामस्थांची मानवी साखळी; ‘अदानी हटाव, भोंगवली बचाव’च्या घोषणा!
भोर, पुणे : भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित असलेल्या पुणे ट्रान्समिशन-३ या खासगी कंपनीच्या हायव्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, आज प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसराभोवती मानवी साखळी तयार करून ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. यावेळी ‘अदानी हटाव, भोंगवली बचाव’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
या प्रस्तावित हायव्होल्टेज सबस्टेशन प्रकल्पाविरोधात व्यापक लढा उभारण्यासाठी भाजपचे नेते तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रकल्प रद्द करण्यासाठी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली जात आहे.
यापूर्वीही संघर्ष समितीच्या वतीने पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर संबंधित प्रकल्पाचे काम दोन महिने बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.