🔥 TRENDING फारबिसगंज में छठ घाट का निरीक्षण, अधिक... जयनगर में काली पूजन जागरण: ग्रामीणों क... जिलाध्यक्ष आदित्य नारायण झा ने अररिया... अररिया में माँ काली के दरबार में काली... कोठीहाट शास्त्री चौक में छठ पूजा समिति... West Bengal Intensifies Preparations f...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

बोगस बियाण्यांमुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सहा एकर भातशेती पेटवली; कंपनी प्रतिनिधीच्या मुजोर वक्तव्याने फुटला संतापाचा बांध.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 11 Nov 2026, 12:22 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
विशेष वृत्त
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
किन्हवली शहापूर मुरबाड ठाणे
दिनांक: ११/११/२०२६
मुरबाड ::
बोगस बियाण्यांमुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सहा एकर भातशेती पेटवली; कंपनी प्रतिनिधीच्या मुजोर वक्तव्याने फुटला संतापाचा बांध
किन्हवली (ता. शहापूर): आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता बियाणे कंपन्यांकडूनही ठगवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात समोर आला आहे. बोगस बियाण्यांमुळे पीक वाया गेल्याने आणि पंचनाम्यादरम्यान बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीने केलेल्या मुजोर वक्तव्यामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या देखत आपल्या सहा एकर भातपिकाला आग लावून दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
किन्हवली परिसरातील वाचकोले येथील शेतकरी मनोहर मलिक यांनी जून महिन्यात पेरणीसाठी सरळगाव येथील एका ॲग्रो सेंटरमधून 'निर्मल सीड्स' कंपनीचे 'एनपीएच-३०' (NPH-30) या जातीचे ३० किलो संकरित भात बियाणे १४ हजार ७०० रुपयांना खरेदी केले होते. कंपनीकडून भरघोस उत्पादनाचे आश्वासन देण्यात आले होते. मलिक यांनी पेरणी व मशागतीसाठी आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च केले. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या शेतातील सुमारे ८० टक्के भातपीक निकृष्ट दर्जाचे, काळे आणि सुकलेले निघाले.
अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या मलिक यांनी २२ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत कृषी सहाय्यक अंकिता मोरे, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी अशोक इसामे व इतर अधिकारी पंचनामा करण्यासाठी मलिक यांच्या शेतावर आले होते. पंचनामा सुरू असताना पिकाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंपनीच्या प्रतिनिधीने "हे बियाणे आकाशातून पडले असेल," असे उपरोधिक आणि मुजोर वक्तव्य केले.
प्रतिनिधीच्या या बेजबाबदार उत्तरामुळे संतापाचा कडेलोट झालेल्या मनोहर मलिक यांनी खिशातून माचीस काढून थेट आपल्या उभ्या पिकाला आग लावली. पाहता पाहता सहा एकरांवर आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि संपूर्ण पीक खाक झाले. या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित अधिकारी व प्रतिनिधी हादरून गेले आणि त्यांची एकच पळापळ झाली.
प्रशासनाची भूमिका:
या प्रकरणाबाबत बोलताना कृषी अधिकारी कुमार यांनी सांगितले की, "किन्हवली परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. या शेतकऱ्याच्या बाबतीतही संबंधित बियाणे कंपनीने फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल."
📲Get App