🔥 TRENDING India's ODI Calendar Ahead of 2027 Wor... Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार.....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 23 Sep 2026, 10:40 AM 👁 29
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ - राष्ट्रीय महामार्गावरील साकरी उड्डाणपुलाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरणगावहून भुसावळकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. हा अपघात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास तनारिका हॉटेल समोर घडला.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील देवेंद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले मिर्झा सलीम बेग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, धडकेत दुचाकी कंटेनरमध्ये अडकल्याने चालकाने ती ड्रीम लँडपर्यंत फरफटत नेली. यावेळी काही तरुणांनी धाडस दाखवत कंटेनरचा पाठलाग केला आणि नशिराबाद टोल नाक्याजवळ कंटेनरला अडवून चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
📲Get App