🔥 ट्रेंडिंग রেজিনগর গণনা কেন্দ্রে কী বললেন নির্বাচ... हनुमानगढ़: पंचायत चुनावों की तैयारियों... রেজিনগরে ভোট গণনার প্রস্তুতি তুঙ্গে ट्रेन से एक युवक की मौत दिल्ली मेट्रो के 57 स्टेशन आज हो सकते... କଟକରେ ମହିଳାଙ୍କ ମୃତଦେହ ଉଦ୍ଧାର, ହତ୍ୟା ସନ...
09 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत....!!!

अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 09 अक्टू. 2026, 10:18 AM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत....!!!

विभागीय प्रतिनिधी

जळगाव : चारचाकी वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करताना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक उघडकीस आली. निभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना ताब्यात घेत वाहनासह तब्बल ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रावेर तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ ७ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. सिल्व्हर रंगाच्या हुंदाई आय-१० कारने एका ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंध असलेला विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामुळे अपघाताच्या निमित्ताने सुरू झालेल्या तपासाला अवैध गुटखा वाहतुकीचे धागेदोरे मिळाले.

या प्रकरणी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, इंदिरानगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुहम्मद कासिम (वय २३, रा. इंदिरानगर, गारखेडा, आलमगीर मशिदीजवळ, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या गुटखा व पानमसाल्याची अंदाजे किंमत ५ लाख ९० हजार ४४० रुपये, तर हुंदाई आय-१० कारची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे समोर आले. अशाप्रकारे वाहनासह एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी निभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला प्रतिबंधित माल नेमका कोठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला पुरविला जाणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या अवैध वाहतुकीमागील मुख्य सूत्रधार तसेच या साखळीत सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील प्रतिबंधित गुटखा वाहतुकीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गवित आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलिस उपनिरीक्षक अभय ठाकणे तसेच पोलिस कर्मचारी सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांचा सहभाग होता.
📲Get App