🔥 TRENDING श्रीगंगानगर के सीमावर्ती गांवों में 35... Fans Praise Intensity of Pakistan-Indi... 32 દેશોના નિરીક્ષકોએ ગુજરાતની મુલાકાત... अलीगंज हनुमान मंदिर में महाप्रसाद वितर... Kumkum Mohod Sets Sights on Olympic Ar... Ekta Kapoor’s Early 2000s Dramas Redef...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अमळनेरमध्ये भरदिवसा अवैध वाळू तस्करांचा हैदोस; कारवाईसाठी पाठलाग करणाऱ्या महिला महसूल अधिकाऱ्याला धडक, चालक फरार.....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 03 Oct 2026, 06:55 PM 👁 13
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर (जळगाव) : शहरात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणे एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला महागात पडले आहे. अवैध वाळूने भरलेल्या टेम्पोचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

पैलाड परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ग्राम महसूल अधिकारी अदिती संतोष जरे या कर्तव्यावर असताना त्यांना लाल रंगाचा विनानंबरचा टेम्पो संशयास्पदरित्या वाळूची वाहतूक करताना आढळला.

सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढविला. त्यामुळे अदिती जरे यांनी दुचाकीवरून टेम्पोचा पाठलाग सुरू केला. पैलाड येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ आल्यावर टेम्पो चालकाने अचानक जोरात कट मारल्याने जरे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्या रस्त्यावर कोसळून जखमी झाल्या.

अपघातानंतरही न थांबता टेम्पो चालकाने भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले. वाहनाला क्रमांक नसल्याने चालकाची ओळख पटू शकलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेतली. फरार टेम्पो चालकाचा शोध घेण्यासाठी डी.बी. पथक रवाना करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अवैध वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
📲Get App