🔥 ट्रेंडिंग निवेशकों ने हरियाणा के औद्योगिक हब में... भुमिका ग्रुप ने जमीन खरीदने की घोषणा क... सोनिपत बन गया भारत का प्रमुख पदक निर्म... केरल ने वरिष्ठ पुरुष हॉकी नेशनल्स में... रायपुर में समाप्त हुआ ISSO राष्ट्रीय अ... अमित शाह ने कहा नक्सलवाद समाप्त, पीड़ि...
16 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अमळनेर तालुक्याला दिलासा; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद.....!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 अक्टू. 2026, 10:32 AM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर - अंतुर्ली-रंजाणे परिसरासह अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यालगत असलेल्या पिंजारी मुस्लिम कब्रस्तान परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या कैद झाला.

गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा तालुक्यात मोठा वावर होता. शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली-रंजाणे, ताडेपुरा आणि टाकरखेडा या परिसरात बिबट्याचे दर्शन घडत होते. या बिबट्याने आतापर्यंत चार ते पाच पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुलाब पिंजारी व त्यांच्या पथकाने रात्रंदिवस गस्त घालत पिंजरे लावून मोहीम राबवली होती. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

अखेर वनविभागाच्या या प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढे नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ वनाधिकारी घेणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
📲Get App