🔥 ट्रेंडिंग अख्तरुल ईमान ने सीमांचल तालीमी कॉन्फ्र... चिचपल्लीतील एचपी‑3 श्री महादेव पेट्रोल... एमएस में एएसआई स्मारकों पर क्यूआर‑कोडे... महाराष्ट्र में तालाठी भर्ती 2026: ऑनला... હિંમતનગર તાલુકાના ધુળેટા ગામમાં નવીન પ... सपा ने यूपी चुनावी घोषणा में बेरोजगार...
27 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

अहिल्यानगर महानगरपालिकेत संविधान दिनाचा उत्सव, महापौर ज्योती गाडे यांच्या उपस्थितीत उद्देशिकेचे सामूहिक वाचन

✍️ रिपोर्टर: Ramesh Sukhdev Khandagale 🗓 26 नव. 2026, 11:52 PM 👁 59
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अहिल्यानगर महानगरपालिकेत संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला, महापौर ज्योती गाडे यांनी उपस्थित राहून उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

अहिल्यानगर, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिनानिमित्त आज अहिल्यानगर महानगरपालिकेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. महापौर ज्योती गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महापौर ज्योती गाडे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व नागरिकांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून दिले. सर्वांनी एका सुरात उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती निष्ठा व कर्तव्याचे पालन करण्याचा संकल्प केला.

यावेळी बोलताना महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, संविधान हे देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. संविधानाने दिलेले हक्क बजावताना आपली कर्तव्येही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत.

संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App