🔥 TRENDING जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three... CCB raids four locations in Kallakuric...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
आर्थिक वादातून व्यावसायिकाच्या हत्येचा कट उधळला; मध्य प्रदेशातील दोघांसह तिघांना अटक

आर्थिक वादातून व्यावसायिकाच्या हत्येचा कट उधळला; मध्य प्रदेशातील दोघांसह तिघांना अटक

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 20 Sep 2026, 03:46 PM 👁 42
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला, २ पिस्तुले, ६ काडतुसे जप्त

नंदुरबार - आर्थिक वादातून एका व्यावसायिकाला संपवण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा कट नंदुरबार शहर पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोन संशयितांसह स्थानिक साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे, विनाक्रमांकाची मोटारसायकल , तीन मोबाईल एक हजार आठशे रू रोख आणि हस्तलिखित नकाशा जप्त करण्यात आला आहे.

मुकेश अर्जुन चौधरी हे या कटातील मुख्य लक्ष्य होते. या प्रकरणी पोलिसांनी देवेंद्र गोकुळदास बैरागी (वय ३४) आणि अभयासिंग मोहनसिंग चव्हाण (वय ४६, दोघे रा. उज्जैन, मध्य प्रदेश) यांच्यासह स्थानिक साथीदार सत्तार मोहन ठाकरे (रा. म्हसावद) याला दि. १८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्व नियोजनानुसार नंदुरबार-चौपाळा रस्त्यावर मुकेश चौधरी यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौधरी यांच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने ते थोडक्यात बचावले.

दरम्यान, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील तंत्रनिकेतनजवळ गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार प्रभारी पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे, एक विना नंबर प्लेट मोटारसायकल, १ हजार ८०० रुपये रोख, तीन मोबाईल फोन आणि एक हस्तलिखित नकाशा जप्त करण्यात आला.

पाच लाखांची सुपारी

प्राथमिक चौकशीत, मुकेश चौधरी यांचा सत्तार ठाकरे आणि पंकज मिश्रा उर्फ दादूशेठ यांच्यासोबत आर्थिक वाद असल्याचे समोर आले आहे. याच वादातून हा हत्येचा कट रचण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. हे कृत्य केल्यानंतर आरोपींना ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. तसेच, हत्येनंतर गुजरातमधील वापी जिल्ह्यातील रायगड तालुक्यातील बेहरा शेठ यांच्या घरी आश्रय घेणार असल्याचेही आरोपींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस करत आहेत.
📲Get App