🔥 TRENDING तिलैया डैम में नहाने गए दो दोस्तों की... गॉव में बार-बार बिजली कटौती से जनजीवन... નેત્રંગ CHCની ગંદકી અને અવ્યવસ્થા જોઈ... गोपालगंज: लापता युवती का शव मिलने के ब... ભરૂચના વોર્ડ નંબર-૨ માં કચરાના સ્થળને... हजारीबाग पुलिस ने विशेष अभियान चलाकर 3...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
आमदार किसनजी कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाडतालुक्यातील पारध वाडी वैशाखरे येथे रंगणार भव्य 'सामुदायिक भोंडाई महोत्सव'!
Local

आमदार किसनजी कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाडतालुक्यातील पारध वाडी वैशाखरे येथे रंगणार भव्य 'सामुदायिक भोंडाई महोत्सव'!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 15 Oct 2026, 06:29 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
'!
सेवा संकल्प अभियानाचा' दिमाखदार सांगता सोहळा; जि. प. माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
विशेष वार्ता पत्र
मुरबाड:दिनांक १६/१०/२०२६.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर राबविण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियानाचा' भव्य सांगता सोहळा उद्या, शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुरबाड तालुक्यात पार पडत आहे. मुरबाड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून वैशाखरे येथील ऐतिहासिक पारधवाडी मैदानावर भव्य 'मुरबाड तालुका सामुदायिक भोंडाई महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्याला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
दुहेरी औचित्य आणि आमदारांचा पुढाकार
गेल्या १७ सप्टेंबरपासून संपूर्ण देशात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा समारोप आणि पवित्र नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून आमदार किसनजी कथोरे यांनी या भागातील संस्कृतीला उजाळा देण्यासाठी या महोत्सवाचे नेटके नियोजन केले आहे. आमदार कथोरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पार पडणारा हा सांगता सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन
भोंडाई हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि विशेषतः महिलांच्या आनंदाचा मोठा उत्सव आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा मुख्य हेतू आमदार किसनजी कथोरे साहेबांनी ठेवला आहे. या पारंपरिक सांस्कृतिक खेळांमुळे स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. जि. प. माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला राजकीय व सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
पारधवाडी मैदानावरदिनांक १७/१०/२०२६रोजी सकाळी ठीक १०:०० वाजल्यापासून या सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या भव्य सांस्कृतिक महोत्सवात मुरबाड तालुक्यातील सर्व आदिवासी महिला, भगिनी, ग्रामस्थ, कला व संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App