🔥 TRENDING यमुना तट पर उमड़ा पूर्वांचल का जनसैलाब... सोतिया में नए छठ घाट पर हुई छठ पूजा, आ... New Wedding Song 'Andagaathiye' Lyrica... Sonari Police Seize 14 Live Bullets fr... Mahesh Babu Pays Tribute to Late Fathe... Jay Shah Reappointed Unopposed as ICC...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

आईच्या मायेचा आणि वेदनेचा हृदयस्पर्शी ‘हुंदका’!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 16 Nov 2026, 10:47 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

‘हुंदका एका आईचा’ लघुपटाचे निवृत्त पोलीस अधिकारी विकास अत्रे यांच्याकडून कौतुक!

आईच्या मायेचा आणि वेदनेचा हृदयस्पर्शी ‘हुंदका’!

‘हुंदका एका आईचा’ लघुपटाचे निवृत्त पोलीस अधिकारी विकास अत्रे यांच्याकडून कौतुक!

पुणे प्रतिनिधी : 16 नोव्हेंबर 2026 तृप्ती फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. रामदासजी राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हुंदका एका आईचा’ या हृदयस्पर्शी लघुपटाचे पुणे येथील निवृत्त पोलीस अधिकारी श्री. विकास अत्रे यांनी विशेष कौतुक केले आहे.

या लघुपटातून आईच्या मनातील वेदना, मातृत्वाचे दुःख, कौटुंबिक नात्यांमधील संघर्ष आणि संकटसमयी कुटुंबाच्या एकजुटीचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवरही भाष्य करण्यात आले आहे.

लघुपटातील नारायणराव या कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत राजेंद्र ताम्हाणे यांनी केलेल्या दमदार अभिनयाचे विकास अत्रे यांनी विशेष कौतुक केले. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्याचे त्यांनी सांगितले.

‘हुंदका एका आईचा’ हा केवळ मनोरंजन करणारा लघुपट नसून आईची माया, माणुसकी आणि कौटुंबिक एकजुटीचा संदेश देणारी सामाजिक कलाकृती आहे. दिग्दर्शक रामदासजी राऊत आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन करून विकास अत्रे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
📲Get App