🔥 TRENDING Rajasthan Panchayat Election: Results... एआई से बनाई फर्जी वीडियो के जरिए ऑनलाइ... ससुर-बहू ने आधी रात को स्कूटी पर सवारी... ग्रेटर नोएडा के सूरजपुर में सड़क निर्म... ससुर-बहू ने आधी रात को स्कूटी पर सवारी... વડોદરા જિલ્લામાં શિનોર ગામમાં સરદાર વલ...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान..! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 31 Oct 2026, 08:14 AM 👁 25
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

पारगाव (ता. आंबेगाव) : माजी गृहमंत्री व सहकारमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि सेवक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते.

तसेच सेक्रेटरी रामनाथ हिंगे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर कीपर अनिल बोंबले, सिव्हिल इंजिनिअर अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी. डी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक वसंत जाधव, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे, शिक्षकवृंद व सेवक वर्ग उपस्थित होते.

शिवनेरी ब्लड सेंटरचे संचालक चंद्रभान वाघ, डॉ. वर्षा शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलन व शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
📲Get App